आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम मुदत:वसतिगृह अधीक्षक आणि पहारेकरी भरतीसाठी अर्जाची आज अंतिम मुदत

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील माजी सैनिक विश्रामगृह व त्र्यंबकरोड येथील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र माजी सैनिक व इच्छुक नागरिकांनी २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी कळविले आहे.

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील वसतिगृह अधीक्षक व सहायक वसतिगृह अधीक्षक या प्रत्येकी एका पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी वसतिगृह अधीक्षक रुपये २९ हजार ८३५ व सहायक वसतिगृह अधीक्षक रुपये २३ हजार २८२ असे मानधन देण्यात येणार आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह व माजी सैनिक विश्रामगृह येथे प्रत्येकी एक पहारेकरी या पदांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी रूपये १२ हजार ९६२ मानधन देण्यात येणार आहे. ही पद भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात आहे. अधिक महितीसाठी ०२५३-२५७७२५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...