आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतील जन्म-मृत्यू विभागात दाखले घेण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच आहे. काही दिवसापूर्वी सॉफ्टवेअरच्या तांत्रिक अडचणीमुळे गोंधळ झाला होता.तर आता ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या जुनी नोंदणीच सापडत नसल्याचे चित्र आहे.अनेकांनी आपले जुने दाखले देवूनही रेकॉर्ड जीर्ण झाल्याचे कारण देत कोर्टातून आदेश आणण्याचे सांगितले जात आहे.
पालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात शहराच्या १८३४ ते १९६० पर्यंतच्या पूर्व विभागातील नागरिकांचे जुने रेकॉर्ड असल्यामुळे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक नाव शोधण्यासाठी अर्ज करतात. या ठिकाणी दररोज किमान शंभर अर्ज येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शोधनावळ अर्जच स्वीकारले जात नसल्याची बाब समोर आली आहे.
त्याचबरोबर, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या नोंदणीच सापडत नसल्याने त्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. तर, अनेकांनी आपले जुने दाखले देऊनही रेकॉर्ड जीर्ण झाल्याचे कारण देत कोर्टातून आदेश आणा असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. काही आठवड्यापूर्वी सॉफ्टवेअरच्या तांत्रिक अडचणी अनेक नागरिकांच्या जन्म व मृत्यू नोंदणी नावात मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे उघडकीस आले होते. तसेच, पूर्व विभागीय कार्यालयात नावात दुरुस्तीचा अर्ज भरण्यापूर्वी लिपिकांची सही घ्यावी लागत असल्याने नागरिकांची चांगलीच वणवण होत आहे.
तसेच, पालिकेकडे जन्म-मृत्यूच्या काही जुन्या नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. ज्या नोंदींचे रेकॉर्ड पालिकेकडे उपलब्ध नाही, त्या नोंदींसाठी जर अर्ज आला, तर संबंधित व्यक्तीकडून त्याबाबतची कागदपत्रे, शपथपत्र घेऊन रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा शेरा असलेले दाखले दिले जातात. दाखला मिळविण्यासाठीचा अर्ज नियमानुसार जन्म- मृत्यू विभागाकडून योग्य त्या फॉर्मेटमध्ये मिळणे आवश्यक असते. मात्र, या विभागाकडून तो अर्ज मिळत नाही. त्यासाठी अर्ज लिहून आणण्याची सक्ती केली जात असते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.