आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा महापालिकेने प्रशासकीय सेवा, वैद्यकीय-आरोग्यसह वेगवेगळ्या ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींना गुरूवारी (दि. २) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आल्याने प्रस्तावित २५०० पदांच्या नाेकरभरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव आता राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले असून या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात हाेणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महासभा पार पडली. २८०० रिक्त पदांमुळे अडचणीत आलेल्या महापालिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पदभरतीच्या घोषणेनंतर दिलासा मिळाला आहे.
अग्निशमन विभागाच्या ३४८ तर वैद्यकीय व आरोग्य विभागातील ३५८ अशा एकूण ७०४ पदांच्या भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेलेली असतानाच आता अडीच हजार पदांच्या भरतीचे वेध लागले आहे.
या भरतीपूर्वी पालिकेतील विविध विभागांच्या संवर्गनिहाय सेवा प्रवेश नियमावलींना शासनाची मंजुरी मिळणे आवश्यक असून त्यासाठी सेवा नियमावलींचे प्रस्तावांना महासभेची मान्यता आवश्यक होती. त्यामुळे महासभेवर प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी(विद्युत ), स्थापत्य, जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
अंदाजपत्रक कार्यक्रमालाही मंजुरी
महापालिकेचे २०२२-२३ चे सुधारित व २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाचा महासभेवर संमत करण्यात आला. त्यानुसार आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले जाईल. स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकाला ३१ मार्च अगर तत्पूर्वी महासभेची अंतिम मान्यता घेतली जाणार आहे.
महासभेत मंजूर झालेले प्रस्ताव
मलनिस्सारण योजनेच्या ३२५ कोटींची मजूुरी गंगापूर धरण थेट जलवाहिनीसाठी ‘मजिप्रा’कडून तांत्रिक तपासणी मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी १० कोटींचा ठेका रुग्णालयांमध्ये स्वयंचलित आग प्रतिबंधक यंत्रणा पंचवटीतील जलतरण तलाव दोन वर्षे देखभालीसाठी खासगी ठेकेदाराकडे अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बानायत यांना रुजू करण्यास मंजुरी कानेटकर जयंतीनिमित्त मनपा, राष्टीय नाट्यविद्यालयातर्फे ‘रंगमहोत्सव’ टाकळी, कपिला संगम सिवेज पंपिंग स्टेशन ३ वर्षांकरिता खासगी कंत्राटादाराकडे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.