आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमा पॉलिसी:कोविड विमा पॉलिसींच्या नूतनीकरणाला मान्यता, साडेतीन, सहा आणि नऊ महिन्यांचे रिन्यूवल शक्य

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“कोरोना रक्षक’ किंवा “कोरोना कवच’ या कोविड विमा पॉलिसींच्या नूतनीकरणासाठी भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) मंगळवारी परवानगी दिली. त्यामुळे जुलैपासून कोविड विमा काढलेल्या विमाधारकांना दिलासा मिळाला.

कोरोना विमा संरक्षणासाठी ग्राहकांची मागणी वाढू लागली होती. ही गरज लक्षात घेऊन २६ जून रोजी आयआरडीएने कोरोना विमा पॉलिसीजसाठी विमा कंपन्यांना परवानगी दिली. त्यानुसार “कोरोना रक्षक’, “कोरोना कवच’ आणि “ग्रुप कोरोना कवच पॉलिसी’ या योजनांच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्याचा लाभ घेत लाखो ग्राहकांनी कोरोना विमा काढला. मात्र कोरोना कधी संपेल याची खात्री नसल्याने विमा सुरक्षेची गरज ओळखून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी मंगळवारी विमा नियमन व विकास प्राधिकरणाने काढलेल्या परिपत्रकानुसार कोरोना विमा पॉलिसी संपणारे ग्राहक त्यांच्या पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी त्या पुढील साडेतीन, सहा किंवा नऊ महिन्यांसाठी त्यांच्या पॉलिसीजचे नूतनीकरण करू शकतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser