आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या महाविद्यालयाचे नॅक झालेले आहे, आकृतीबंध तयार आहे, अशा महाविद्यालयात रिक्त जागांपैकी 50 टक्के प्राध्यापक ( यापुर्वीच्या 2089 रिक्त जागा वगळून ) तसेच ग्रंथपाल, वरिष्ट लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. इतकेच नाही तर अनेक दिवसांपासून जी मागणी होती, त्यानुसार सीएचबीवर (तासिका तत्वावर) काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा पगार 12 ते 14 हजार हाेता, विद्यापिठ अनुदान आयाेगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैसे द्यायचा निर्णय घेतला असून त्यांचे वेतन आता 30 ते 32 हजार रूपये हाेइल, अशी माहीती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपकेंद्राचे भुमिपुजन कार्यक्रमानंतर सावंत पत्रकारांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण क्षेत्राशी निगडीत विविध अडचणी जाणून घेण्यासाठी दहा दिवसांपुर्वी बैठक बाेलाविली हाेती. त्यात ह्या भरतीला तत्वत: मान्यता दिली असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. अनुकंपा तत्वावरील भरती बंद नाही, असे प्रस्तावही अडवून ठेवू नये, असे आदेश आपण दिलेले असून जेथे कुठे संस्थाचालकांकडून प्रस्ताव येत नाहीत, असे समाेर येते तेथे शिक्षण उपसंचालकांना हस्तक्षेप करायला आम्ही सांगितलेले असल्याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. दिक्षांत साेहळ्याची संकल्पना थाेडी बदलली पाहीजे, प्रमुख पाहुण्याची मिरवणूक काढली जाते, पण ज्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे, सुवर्णपदक मिळविले आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांची ती निघाली पाहीजे, असे आपले मत असल्याचे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
युपीएससीच्या तयारीसाठी मुलांना दिल्लीत सुविधा देणार
दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे केंद्रीय लाेकसेवा आयाेग (युपीएससी) च्या परिक्षांकरीता दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब यांची मुले चांगले यश संपादीत करीत आहेत. यंदाही 23 विद्यार्थी युपीएससीत पुढे गेले, जे अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. मग इतके कष्ट सहन करणाऱ्या या मुलांसाठी सरकार म्हणून किमान सुविधा तरी उपलब्ध करून देणे सरकारचे कर्तव्य आहे. त्याच दृष्टीकाेनातून आता दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून किमान शंभर मुले येथे राहु शकतात, असे सामंत यांनी यावेळी सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.