आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या महाविद्यालयाचे नॅक झालेले आहे आणि आकृतिबंध तयार आहे अशा महाविद्यालयात रिक्त जागांपैकी ५० टक्के प्राध्यापक (यापूर्वीच्या २०८८ रिक्त जागा वगळून) तसेच ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरण्यास शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. तसेच तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा पगार १२ ते १४ हजार हाेता, तो वाढवण्याची मागणी होती. विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैसे द्यायचा निर्णय घेतला असून त्यांचे वेतन आता ३० ते ३२ हजार रुपये हाेईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मंत्री सावंत पत्रकारांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण क्षेत्राशी निगडित विविध अडचणी जाणून घेण्यासाठी दहा दिवसांपूर्वी बैठक बोलावली हाेती. त्यात या भरतीला तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. अनुकंपा तत्त्वावरील भरती बंद नाही, असे प्रस्तावही अडवून ठेवू नये, असे आदेश आपण दिले आहेत. जेथे संस्थाचालकांकडून प्रस्ताव येत नाहीत असे समाेर येते तेथे शिक्षण उपसंचालकांना हस्तक्षेप करायला आम्ही सांगितले आहे.
यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत सुविधा देणार
दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या (यूपीएससी) परीक्षांसाठी दिल्लीत महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब यांची मुले चांगले यश संपादित करीत आहेत. त्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याठिकाणी किमान १०० मुले येथे राहू शकतील अशी व्यवस्था असेल, असे मंत्र सामंत यांनी या वेळी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.