आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्यशैलीच्या विविध छटा:नाशिकमध्ये भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'जल्लोष स्वातंत्र्याच्या' संकल्पनेवर अरंगेत्रम

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुजननाद संस्थेतर्फे दिनांक 4 जून रोजी पहिले अरंगेत्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाकवी कालिदास नाट्यगृहात सकाळी 11 वाजता गुरू शिल्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे

कार्यक्रमात परंपरागत मार्गम असला तरीही त्यातील रचना स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्त्रिया म्हणजेच स्त्री क्रांतिकारक या आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित आहे. यातील रचना ही भारताच्या ज्येष्ठ नृत्यांगना डॉक्टर सुचेता भिडे चापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या स्मिताताई महाजन यांनी लिहून स्वरबद्ध केली आहे.

नाशिकची ख्यातनाम गायिका ईश्वरी दसकर यांनी सर्व रचना नाविन्यपूर्ण संगीतबद्ध केल्या आहेत. रचनांची संरचना गुरू शिल्पा देशमुख यांनी स्वतः साकार केली आहे. त्याच्यावर सोहा कुलकर्णी आपल्या पहिल्या अरंगेत्रममध्ये नृत्याविष्कार सादर करणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अर्चना व मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...