आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गवऱ्यांचे वाटप‎:वृक्षसंवर्धन; 11000  गवऱ्यांचे वाटप‎

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ होळी हा सण सर्वत्र आनंदाने‎ साजरा होत असताना वृक्षांची‎ कुठेही कत्तल होऊ नये, याकडे‎ कटाक्षाने लक्ष देत कॉलेज रोड‎ येथील वर्षा विनोद येवले यांनी‎ तब्बल परिसरातील नागरिकांना‎ होळी करण्यासाठी 11000 गौर्यांचे‎ वाटप करत सर्वांना होळीच्या‎ शुभेच्छा दिल्या.‎ विनोद येवले हे दरवर्षी होळी‎ पर्यावरणपूरक करण्यासाठी आग्रही‎ असतात. त्यानुसारच ते प्रभाग‎ क्रमांक १२ दरम्यान येणाऱ्या सर्व‎ परिसरात स्वतः जातीने लक्ष घालून‎ कुठेही वृक्षांची कत्तल करून‎ लाकडाची होळी होणार नाही,‎ यासाठी लक्ष ठेवून असतात. यंदाही‎ त्यांनी यावर बारकाईने लक्ष ठेवले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.

तसेच होळी कशी करणार या‎ नागरिकांच्या प्रश्नालाही विविध‎ सोसायटी आणि मंडळांना‎ होळीसाठी ११००० गौऱ्याचे वितरण‎ करत समर्पक उत्तर दिले. त्यात‎ महात्मा नगर, सिटी सेंटर मॉल,‎ संभाजी चौक, कॅनडा कॉर्नर, पी एन‎ टी कॉलनी, विसे मळा, पारिजात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नगर, कॉलेज रोड उत्कर्ष नगर,‎ संभाजी चौक, कल्पना नगर,‎ विकास कॉलनी, सहजीवन‎ कॉलनी, कॅनडा कॉर्नर , उत्कर्ष‎ नगर, सिद्धार्थ नगर,उषाकिरण‎ सोसायटी, प्रभागातील या‎ परिसरातील मंडळांचा समावेश‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...