आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सव:सिडको परिसरात पाेलिसांचे सशस्त्र संचलन ; परिसरात तब्बल 112 गणेश मंडळ स्थापित

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिडको परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबड पोलिसांकडून सिडको भागात रूट मार्च काढण्यात आला.गेल्या दोन वर्षांपासून काेरोना महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसह गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र निर्बंध उठविल्याने धुमधडाक्यात गणेशाेत्सव साजरा होत असून अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिडको परिसरात तब्बल ११२ सार्वजनिक मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरोघरी तसेच गल्लोगल्ली गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी अनुचित प्रकार घडू नये टवाळखोर गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने अंबड पोलिसांकडून पवननगर, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक यांसह विविध परिसरात मुख्य मार्गावर सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला. पाेलिसांच्या या सशस्त्र संचलनात ७ अधिकारी, ६० अमलदार, आठ होमगार्ड तसेच सहा पोलिस वाहने सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...