आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धांच्या अस्थिकलश पदयात्रेत थायलंडचे 110 भिक्खू सहभागी:धम्म पदयात्रेचे नाशकातील टाकळी विहारात आगमन

नाशिक रोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी ते दादर चैत्यभूमी येथे निघालेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या कलशाची बौद्ध धम्म पदयात्रा सोमवारी नाशिक शहरातील टाकळी येथील बुद्धविहारात आगमन झाले होते. या वेळी शहरवासीयांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

गगन मलिक फाउंडेशन इंडिया, भारतीय बौद्ध महासंघ, युवा आश्रय फाउंडेशन परभणीच्या संयुक्त विद्यमाने परभणी ते दादर चैत्यभूमी पवित्र अस्थिकलश पदयात्रा काढण्यात आली असून, ही पदयात्रा सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिक शहरात दाखल झाली. या वेळी नाशिक रोड परिसरातील टाकळी येथील गौतम बुद्धविहार येथे भाविकांना अस्थिकलशाचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या वेळी थायलंड येथील ११० भिक्खूंनी बुद्धवंदना घेतली. पदयात्रा शहरात दाखल झाल्यानंतर टाकळी येथे उपासकांनी भिक्खूंवर पुष्पवर्षाव केला. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी महिलांनी शुभ्र साड्या परिधान केल्या होत्या. या वेळी माजी महापौर अशोक दिवे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, राहुल दिवे, शरद आहेर, प्रज्ञासागर भोसले हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...