आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कला उत्सव - 2022  मध्ये मराठा चे यश

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आयोजित “कला उत्सव - २०२२ मध्ये विविध इव्हेंटमध्ये घवघवीत यश संपादित केले.द्विमित चित्र (डिझाइन) मध्ये ओम शेजूळ या मराठा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला व धनश्री थोरात (१० वी फ) हिने द्वितीय, त्रिमित शिल्पमध्ये इशा माळोदे (१० वी ह) हिने प्रथम तर खेळणी बनविणे प्रकारात गौरव पवार (१० वी क) याने प्रथम क्रमांक मिळवला.

या सर्व विद्यार्थ्यांनी विभागीय पातळीवर यश संपादित केल्याने त्यांची राज्य पातळीवर औरंगाबाद येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना कलाशिक्षक दत्तात्रय पवार, जगदीश डिंगे, केशव खताळे, चित्रलेखा नाठे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, नाशिक शहर तालुका संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश पिंगळे, संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ.भास्करराव ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. अशोकराव पिंगळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे, मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक संजय डेर्ले, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...