आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम विसर्जन:पालिकेतर्फे सहा विभागांत कृत्रिम विसर्जनस्थळे निश्चित

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाेत्सव काळात निर्माल्य आणि गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी महापालिकेकडून सहा विभागांत ७१ कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात येणार असून याच ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार अहे. गाेदावरीसह शहरातील विविध नद्यांचे प्रदूषण राेखण्यासाठी पालिकेतर्फे ही उपाययाेजना करण्यात आली आहे. कृत्रिम विसर्जनस्थळांवर फक्त दहा दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची सुविधा लपलब्ध असून तीन, पाच, सात दिवसाच्या मूर्तींचे विसर्जनाकरिता नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील.

महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

गणेशमूर्तींचे नदीपात्रात थेट विसर्जन न करता विसर्जनस्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबत शहरातील नागरिकांना आवाहन केले की, घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये. पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान कराव्यात, तसेच निर्माल्य हे संकलन केंद्रांवर जमा करावे. दीड, तीन, पाच, सात दिवसाच्या मूर्तींचे विसर्जनाकरिता नैसर्गिक विसर्जनस्थळे उपलब्ध असतील. गाेदावरीसह विविध नद्यांचे प्रदूषण राेखण्यासाठी उपाय आखण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले असून नियमांची अंमलबजावणी करणे आता मंडळांच्या हाती आहे.

दहा दिवसांच्या गणेशमूर्तींसाठी कृत्रिम विसर्जनस्थळे
कृत्रिम विसर्जनस्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जनाकरिताच उपलब्ध असणार आहेत. तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी कृत्रिम विसर्जनस्थळे राहणार नसून निर्माल्य संकलन केंद्र असणार आहेत. याची नाेंद घेणयाचे आवाहन पालिकेने केले आहे.

विभागनिहाय कृत्रिम स्थळे पूर्व विभाग : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ टाकळी राेड, नंदिनी गोदावरी संगम. नाशिक रोड : दसक घाट, चेहडी गाव दारणा नदी, देवळाली गाव वालदेवी नदी, विहीतगाव वालदेवी नदी, वडनेर गाव वालदेवी नदी. पंचवटी : म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा. सिडको : पिंपळगाव खांब, वालदेवी घाट, चुंचाळे राेड, म्हाडा काॅलनी. पश्चिम विभाग : यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटेश्वर पटांगण, घारपुरे घाट, हनुमान घाट. सातपूर : गंगापूर धबधबा व अमरधाम, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी.

बातम्या आणखी आहेत...