आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा:मेंटल कॅलक्युलेशन्स वर्ल्डकप स्पर्धेत नाशिकच्या आर्यनने मारली बाजी, 5 विश्वविक्रमांसह जेतेपद पटकावले

प्रतिनिधी । नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा अंकी आकड्यांची बेरीज, वर्गमुळं अवघ्या काही क्षणात सोडवत जागतिक स्तरावरील मेंटल कॅलक्युलेशन्स वर्ल्डकप स्पर्धत नाशिकच्या आर्यन शुल्कने विजेतेपद पटकावले. १५ देशांतील ४० स्पर्धंक यात सहभागी झाले होते. या सर्वांना मात देत आर्यनने या स्पर्धेत बाजी मारत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विश्वविक्रमावर नाव कोरले

जर्मनी येथील पेडरबोर्न येथे पार पडलेल्या मेंटल कॅलक्युलेशन्स वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व आर्यन नितीन शुक्ल याने केले. स्पर्धेत जपानचा ओनो टेस्तुया याने दुसरे, लेबनानच्या मुहम्मद अल मीर याने तिसरे, जपानच्या नाऊटो हिगा याने चौथे तर अमेरिकेच्या सॅम्युएल इंजेल याने पाचवे स्थान पटकावले. १५ देशातील सर्वोत्कृष्ट ४० ह्युमन कॅलक्युलेटरची या स्पर्धेत निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्वात वयस्कर स्पर्धक हा साठ वर्षांचा होता. तर १२ वर्षाच्या आर्यनने आपल्या पहिल्याच स्पर्धेत जिंकण्याचा पराक्रम केला. त्या शिवाय ५ विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केले.

जपानचे वर्चस्व मोडले

एमसीडब्ल्यूसी या नावाने मेंटल कॅलक्युलेशन्स क्षेत्रात नावारुपास असलेली ही स्पर्धा प्रतिष्ठितेची मानली जाते. गेल्या दोन्ही स्पर्धांत जपानी खेळाडूंनी पहिले दोन स्थान पटकावून आपला दबदबा निर्माण केलेला होता. तर, २०२० मध्ये होणारी ही स्पर्धा चषक कोव्हिडमुळे २०२२ मध्ये पार पडली.

असे नोंदवले विश्वविक्रम

ही स्पर्धा लेखी स्वरूपाची असून यात १० विषयांची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी ७ ते १० मिनिटांचाच वेळ दिला जातो. स्पर्धेत १० अंकी १० संख्यांची बेरीज करण्याच्या प्रकारात आर्यनने ७ मिनिटांत २९ सेट सोडवले. तसेच ६ अंकी संख्येचे ५ अपूर्णांकापर्यंत वर्गमूळ काढण्याच्या प्रकारात आर्यनने ७४ संख्यांचे अचूक वर्गमूळ १० मिनिटात काढून विक्रम केला. जो आधी ४२ चा होता. तसेच जास्तीत जास्त १० अंकी भागिले ५ अंकी संख्या सोडवणे, दोन ८ अंकी संख्यांचे गुणाकार करणे, १००० या संख्येला सहा अंकी संख्येच्या वर्गमुळाने भागणे असे आणि इतर असे १० प्रकारचे क्लिष्ट प्रश्न आर्यनने सोडवले. या शिवाय स्पर्धेत सर्वांना स्वेच्छेने विश्वविक्रम करण्याची संधी देखील होती. त्यात आर्यनने २० अंकी संख्येला २० संख्येने १ मिनिट ४५ सेकंदात गुणून आधीचे ३ मिनिटांचे रेकॉर्ड मोडले. तसेच ५ अंकी संख्येला ५ अंकी संख्येने कमी वेळात गुणायचे रेकॉर्ड देखील केले. ० अंकी संख्येला ५ अंकी संख्येच्या १० सेटला ४१ सेकंदात सोडवून नवा विश्वविक्रम केला. जो आधी ५३ सेकंदांचा होता. हे रेकॉर्ड भविष्यात सुधारण्याचा आणि आणखी काही रेकॉर्ड करायचा मानस आर्यनचा आहे.

बातम्या आणखी आहेत...