आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • As Many As 52 Vacancies For Doctors In Rural Areas; Doctors Think Rural People Are Busy In Hospitals In Uninhabited Cities |marathi News

रिक्त पदांचा आजार:ग्रामीण भागात तब्बल 52 डॉक्टारांची पदे रिक्त; डॉक्टरांना ग्रामीणला वाटते अनइझी शहरांतील रुग्णालयांत मात्र बिझी

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या २८ ग्रामीण रुग्णालयांत ५२ डॉक्टरांनी पाठ फिरवल्याने पर्यायाने येथील रुग्णांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात यावे लागत असल्याने जिल्हा रुग्णालयावरील भार दिवसेंदिवस वाढतोच आहे. ग्रामीण अदिवासी भागात बालरोग तज्ज्ञांच्या ९ आणि १३ स्त्रीरोग तज्ज्ञांसह २३ भूलतज्ज्ञांची पदे आणि ७ भीषक ही पदे रिक्त आहेत. या प्रकाराने आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात दर्जेदार रुग्णसेवा दिली जात असल्याचा दावा फोल ठरला आहे.

सेवा खासगी रुग्णालयात
डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात हजेरी तर लावतात, मात्र शहरातील खासगी रुग्णालयात सेवा देत असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. यावर कारवाई होत नसल्याने आरोग्य प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आहे.

ग्रामीणमधून रुग्ण सिव्हिलमध्ये
ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचे सांगत संबंधित मेडिकल अधिकारी रुग्णास जिल्हा रुग्णालयात पाठवतात. ग्रामीण भागात गर्भवतींना वेळीच उपचार मिळत नसल्याने त्यांची प्रसूती रुग्णवाहिकेत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

महिन्यातील दोन वेळा मुलाखत
ग्रामीण भागातील पदांसाठी १ व १५ तारखेला जिल्हाधिकारी मुलाखत घेतात. बॉण्ड असलेले डॉक्टर १ वर्ष काम करतात. मात्र पुन्हा शासकीय सेवेत येत नाही. शासनाने वेतन वाढ केली आहे. - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

पदे मंजूर अतिरिक्त
पदे भरलेली
स्त्रीरोग, प्रसूती तज्ज्ञ ४ ८
अस्थिरोग तज्ज्ञ ३ ४
त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ १ २
एमबीबीएस ७ ८
भूलतज्ज्ञ ४ २

जिल्ह्यातील रिक्त पदे २३ भूलतज्ज्ञ ०७ भीषक ०९ बालरोग तज्ज्ञ १३ स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...