आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात महिन्याभरात डेंग्यूचे तब्बल 91 रूग्ण:रुग्णसंख्येचा आकडा 164 वर; आराेग्य यंत्रणा ठरतेय अपयशी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना, स्वाईन फ्लू पाठोपाठ शहरात डेग्यूंचा कहर वाढतच असून ऑगस्ट महिन्यातच तब्बल 91 नवीन रूग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंत शहरातील डेंग्यू बाधीत रुग्णसंख्येचा आकडा 164 वर पोहोचल्याची माहिती आराेग्य विभागाकडूनच समाेर आली आहे. या वाढत्या रूग्ण संख्येमुळे आराेग्य यंत्रणेच्या उपाययाेजना फाेल ठरल्याचे दिसून येत आहे.

काेराेनाच्या महामारीच्या दाेन वर्षांच्या काळात स्वाईन फ्लू, डेंग्यू,हिवताप, चिकुनगुन्या सारख्या आजाराच्याल रूग्णांकडे दुर्लक्ष झाले हाेते. सद्यस्थितीत काेराेनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने आता इतर आजारंनी डाेके वर काढल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची पैदास डेंग्यूची रूग्ण संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत असली तरी मनपा प्रशासनाने डास निर्मूलन मोहिम अधिक तत्परतेने राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

स्वाईन फ्लूबळींचा आकडा 16 वर पोहोचला आहे. यात नाशिक शहरातील सहा तर ग्रामीणमधील चौघांचा समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी अहमदनगरचे पाच, एक पालघरचा रहिवासी आहे.

6 महिन्यात 11, एका महिन्यात 91 रूग्ण

जानेवारीत 15, फेब्रुवारी 11, मार्च 2, एप्रिल 6, मे 5 तर जून महिन्यात डेंग्यूंचे 11 रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये डेंग्यूबाधितांचा आकडा 23 वर पोहोचला. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत डेंग्यू बाधितांची संख्या 73 इतकीच होती. मात्र, ऑगस्टमध्ये डेंग्यूने थैमान मांडत एकाच महिन्यात संशयित 300 रुग्ण आढळले. या रुग्णांची रक्ततपासणीनंतर 91 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे शहरातील डेंग्यू बाधितांचा आकडा 164 वर पोहोचला.

चिकुनगुनियाच्या 108 संशयित रुग्णांपैकी 17 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गतवर्षी नाशकात चिकुनगुनियाची मोठी साथ असल्याने ऑगस्ट 2021 मध्ये 209 रुग्ण आढळले होते.

नाशिकरोडला सर्वाधिक रुग्ण

शहरातील 91 रूग्णसंख्येत सर्वाधिक नाशिकरोडला 42 रूग्णांना लागण झाली आहे. त्याखालोखाल सिडकाेत 32, पंचवटी 30, पूर्व 25, सातपूर 23 तर नाशिक पश्चिम विभागात डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले आहेत. तरी मनपा हिवताप विभागाने गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूसंख्या कमी असल्याचा दावा करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...