आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्वर ओक हल्ला प्रकरण भाेवले:उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर न झाल्याने एक कर्मचारी बडतर्फ तर दाेन निलंबित

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय विलीनीकरणाची मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पूकारला हाेता. या संपात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासीस्थानी चप्पल, दगडफेक केली हाेती. प्रकरणात सहभागी असलेले पेठ आगारातील तीन कर्मचाऱ्यांवर एसटीने कारवाई केली आहे. एक कर्मचारी बडतर्फ तर दाेन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अनियमित व तुटपुंजे वेतन मिळत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय विलीनीकरणाची मागणी करत संप पूकारला हाेता. तब्बल सहा महिन्यांहून अधिक कालावधीत सुरु राहिलेल्या या संपामुळे एसटी महामंडळाला काेट्यवधीचा फटका बसला हाेता. संपकरी कर्मचाऱ्यांकडून मुंबईतील आझाद मैदानावर आंदाेलन देखील केले जात आहे. दरम्याान आंदाेलनकर्त्यांकडून पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थाावर हल्ला करण्यात आला हाेता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाेलिसांनी हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक देखील केली हाेती.

या प्रकरणात विभागातील पेठ आगारातील तीन कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे समाेर आले हाेते. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर न झाल्याने पेठ आगाराच्या एक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची तर शिस्त व आवेदन नियमप्रमाणे दाेन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...