आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:आंदाेलनाचा इशारा देताच रस्ता झाला माेकळा‎

नाशिक‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकाेतील भुजबळ फार्मनजीक‎ सुंदरबन काॅलनीत माजी महापाैर‎ विनायक पांडे यांच्या ‎ निवासस्थानासमाेरील काॅलनी अंतर्गत ‎ ‎ रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून लाेखंडी ‎ पाइप लावून वाहतुकीसाठी बंद‎ करण्यात आला हाेता. आता‎ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा रस्ता‎ खुला न झाल्यास आंदाेलन करण्याचा‎ इशारा देताच हा रस्ता तत्काळ माेकळा‎ करण्यात आल्याने या परिसरातील‎ नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.‎ यांसदर्भात, शिवसेनेचे पदाधिकारी‎ याेगेश बेलदार व शिष्टमंडळाने १५‎ दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त डाॅ.‎चंद्रकांत पुलकंुडवार यांची भेट घेऊन‎ त्यांना निवेदन दिले हाेते.

या निवेदनात‎ म्हटले आहे की, सुंदरबन काॅलनीतील‎ अंतर्गत रस्ता काेणीतरी अज्ञात‎ व्यक्तीने स्वत:च्या फायद्यासाठी‎ लाेखंडी पाइप टाकून रहदारीस बंद‎ केला आहे. . सिडकाेतील व या‎ परिसरातील रहिवाशांनी लेखानगर,‎ शिवाजी चाैक, बडदेनगर, त्याचबराेबर‎ सुंदरबन काॅलनीतून बाहेर पडून‎ गाेविंदनगर, सद‌्गुरूनगर व‎ महामार्गाकडे जाण्यासाठी अडथळा‎ निर्माण हाेताे.

हा रस्ता बंद केल्याने‎ पुढील चाैकातून फिरून जावे लागते,‎ याचा ज्येष्ठ नागरिकांसह शालेय‎ विद्यार्थ्यांना फटका बसताे. त्यांना‎ विलंब हाेताे. तरी हा रस्ता खुला न‎ केल्यास शिवसेना स्टाइलने आंदाेलन‎ करण्याचा इशारा दिला हाेता. दरम्यान,‎ महापालिकेने या आंदाेलनाची दखल‎ घेत रस्ता खुला केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...