आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट माेहीम अधिक तीव्र:रस्ते प्राधिकरण ने फटकारताच पाेलिस यंत्रणा अॅक्शन माेडवर; पुन्हा हेल्मेटसक्ती

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाढत्या अपघातांबाबत काय उपाययाेजना केल्या आहेत असा जाब रस्ते प्राधिकरण समितीने पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना विचारताच त्यांच्यासह यंत्रणा अॅक्शन माेडवर आली आहे. परिणामी १ डिसेंबरपासून शहरात पुन्हा हेल्मेटसक्तीची माेहीम राबविण्यात येणार आहे. रस्ते अपघातात विनाहेल्मेट दुचाकीचालकांचा बळी जात असल्याच्या घटना वाढल्या आहे.

विनाहेल्मेट असलेल्या दुचाकींच्या अपघातात ८३ चालकांनी जीव गमावला आहे. २६१ चालक कायमचे जायबंदी झाले आहे. या वाढत्या अपघातांची दखल घेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेटसक्ती लागू केली आहे.

यासंदर्भात रस्ते प्राधिकरण समितीने पाेलिसांना जाब विचारला हाेता. त्यामुळे आता १ डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती अधिक तीव्रपणे लागू केली जाणार आहे. तत्कालीन आयुक्त दीपक पांडेय यांनी सुरू केलेल्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या कारवाईची देशभरात चर्चा झाली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हेल्मेटसक्ती कारवाईला ब्रेक लागला होता.वाढते अपघात आणि अन्य जीवितहानी टाळण्यासाठी मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२९/१७७ नुसार आता दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद आहे.

चांगल्या प्रतीचे हेल्मेट वापरण्याचे पाेलिसांचे आवाहन
रस्ते अपघातात मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट गरजेचे आहे. काही दुचाकीचालक कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावरील हेल्मेट घेतात. मात्र कमी दर्जाच्या हेल्मेटमुळे डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. मृत्यूही होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी उच्च दर्जाच्या हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...