आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानेच त्यांना पोटदुखी : किशोरी पेडणेकर

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी सख्खा चुलतभाऊ उद्धव ठाकरे बसल्यानेच त्यांना पोटदुखी झाली असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाशकात केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेगवेगळ्या कारणाने अडचणीत आणण्यासाठीच राज ठाकरे यांच्याकडून आंदाेलने केली जात असून त्यांचा मागचा चेहरा उघड झाल्याची टीका त्यांनी केली.

भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. एकेकाळी तुम्हाला शरद पवार पितृतुल्य हाेते. मग आताच का भूमिका बदलली? यासह विविध प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंच्या आंदाेलनाला महत्त्व न देण्याचे आवाहनही पेडणेकर यांनी केले. याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिआे शेअर केल्याबद्दलही त्या म्हणाल्या की, बाळासाहेबांना आत्मक्लेश देणारे, सेना भवनवर दगडफेक करणारे तुम्हीच होते. हे देशाने पाहिले आहे. मग आता का बाळासाहेबांच्या नावाचा वापर करतात? असा सवाल उपस्थित करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा आज सर्व शिवसैनिकांमध्ये दिसून येताे अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.

बातम्या आणखी आहेत...