आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको-सातपूर परिसरात पाणी बाणी:1200 व्यासाची जलवाहीनी फुटल्याने नागरिकांची पाण्यासाठी उडाली तारांबळ

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - सातपूर शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 1200 व्यासाची जलवाहीनी फुटल्याने नागरीकांना अजूनही दोन दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

कामाला मारावी लागत आहे दांडी

मनपासह सामाजिक कार्यकर्त्यांनी टंकरव्दारे पाणी पुरवठा सुुरू केला आहे. मात्र टंकरची वेळ निश्चित नसल्याने पाणी मिळवण्यासाठी अनेक महिलांनी कामाला दांडी मारावी लागत आहे. एकुणच कुठे टंकर तर कुठे हातपंपावर पाण्यासाठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे जलवाहीनीवर कार्यान्वित गॅस लाइन आल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने किरकोळ दुरुस्तीसाठी धरणातून पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शनिवारी (दि.20) शनिवारी शहरातील पाणी पुरवठा पुर्णपणे बंद तर रविवारी (दि.21) कमी दाबाने पाणी पुरवठा झाला होता. याचवेळी सातपूर- त्र्यंबक रोडवरील अमृत गार्डन चौकातील बाराशे मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत सिडको - सातपूरकरांची झाली आहे. 25 फुट खोल जमीनीखाली असलेल्या सिमेंटची जलवाहीनी दुरुस्तीचे काम युध्तपातळीवर सुरु असले तरी किमान दोन दिवस तरी पाणी टंचाईचे संकट कायम राहणार आहे. दरम्यान चार दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या नागरीकांची सकाळच्या दिनचर्येपासूनच अडचण होऊ लागली आहे. घरातील महिलांची पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. या काळात महापालिका प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेऊन खासगी टंकरव्दारे नागरीकांना पाणी पुरवठा करण्याचे काम सुरु केले आहे. मनसेचे नेते सलीम शेख व सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी गेल्या दोन दिवसांपासून 15 ते 20 खेपांव्दारे खासगी टंकरने नागरीकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला.

गॅस पाईपलाइनमुळे कामात अडथळा

अमृत गार्डन येथील फुटलेल्या जलवाहीनीच्या वरून नेमकी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची कार्यान्वित असलेली पाइप लाईन गेलेली आहे. तसेच मोबाईल केबल्स देखील गेलेल्या आहेत. कार्यान्वित गॅस लाइनमुळे कामात ऐनवेळी बदल करावा लागत आहे. त्यामुळे 600 मिमी एमएस कटपाइप ऐवजी आता 400 मिमी व्यासाचे व 18 फुट लांबीचे पाच पाइप जोडावे लागणार असल्याने दुरुस्तीचे कामाला वेळ लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...