आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकरावीची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि. ३) जाहीर होणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेसाठी यंदा ९६ टक्के तर वाणिज्य शाखेसाठी ९१ टक्के कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीसाठी यंदा जास्त विद्यार्थी पात्र ठरल्याने कट ऑफ २ ते ३ टक्के वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त हाेत आहे. दहावीच्या निकालात झालेली वाढ आणि पहिल्या यादीसाठी पात्र ठरलेली सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीतील किती विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळते याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे. पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ६ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
राज्यभरातील प्रमुख शहरांत अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत आहे. दीड महिन्यापासून प्रवेशप्रक्रिया रखडली होती. अखेर सीबीएसइ निकालानंतर सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात आली. यानुसार प्रवेशप्रक्रियेचा पहिला व दुसरा भाग भरलेले १६ हजार ९५९ विद्यार्थी पहिल्या गुणवत्ता यादीसाठी पात्र ठरले आहेत. पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर दुसऱ्या यादीपूर्वी प्रवेश अर्जाचा भाग दोनमध्ये बदल करण्याची सुविधा दिली जाते.
गुणवंतांची संख्या वाढली
दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रक्रियेत पहिल्या यादीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने कटऑफ दोन ते तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
बी. एस. जगदाळे, प्राचार्य, पंचवटी कॉलेज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.