आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसचे टायर फुटल्याने बसदुभाजक ताेडूनदुसऱ्या लेनमध्येगेली. यात एका दुचाकीला जाेरदार धडक बसल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला आहे. मागे बसलेली युवती गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी (दि. ११) सकाळी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेलगाव ढगा परिसरात हा दुर्देवी अपघात घडला. अपघातानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात महाविद्यालयीन युवकांनी गर्दी केली हाेती. पुणे येथून नर्मदा परिक्रमासाठी निघालेली ट्रॅव्हल्स बस (एमएच ४७ एएस ४८४८) शुक्रवारी (दि. १०) रात्री त्र्यंबकेश्वरला पाेहाेचली हाेती.
बसमध्ये चालकासह एकूण ३२ प्रवासी प्रवास करीत हाेते. रात्री त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम केल्यानंतर शनिवारी (दि. ११) सकाळी बस पुढील मार्गक्रमणासाठी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या दिशेने निघाली हाेती. बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पॅलिअर स्कूलजवळ बस आली असता तिचे टायर फुटल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये आली. याचवेळी नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४१ बीजी२३६३ व टीव्हीएस स्पाेर्ट एमएच १५ इजे ५६९५ या दाेन दुचाकींना धडक देत बस झाडावर आदळली. यात एका दुचाकीवरील दाेघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.