आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लव्ह जिहाद' विरोधी कायदे घटनाबाह्य:कायदा आणू पाहणाऱ्यांनी आधी राज्यघटनेचा अभ्यास करा - खा. ओवेसी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह आणि जिहाद हे एकत्र होऊच शकत नाही, लव्ह जिहादच्या नावाने केवळ बदनामी केली जात आहे. महाराष्ट्रात यासंदर्भात कायदा आणला जात असल्याने आधी सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा असा सल्ला एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्य सरकारला दिला.

नाशिकमध्ये खासगी दौर्‍यावर आलेले असता असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलतांना सागितले की, दोन दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ही मध्य प्रदेश सरकारच्या एका निर्णय ज्यात अशा लग्नासाठी डीएमला नोटीस द्यावी यावर स्टे दिला आहे. भाजपमधील अनेकांनी अशा लग्न केलेल्या अशांना काय करणार? देशात केवळ हाच एक मुद्दा आहे की बेरोजगारी ही मुद्दा आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक बेरोजगार हे भारतात असून 8 टक्के बेरोजगारी देशात आहे. भारतीय जनता पक्ष बेरोजगार तरुणांना भटकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत पेट्रोल, डीझलच्या वाढत्या दर आणि राज्याच्या शेतकर्‍यांकडे या सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.

राज्यपालांचे वक्तव्य चुकीचेच

दरम्यान,असदुद्दीन ओवेसी यांनी महापुरुषांबाबत केल्या जाणार्‍या वक्तव्यांबाबत निषेध व्यक्त करत राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य अतिशय चुकीचे असल्याचे सागितले.

बुधवारी औरंगाबादहून नाशिककडे निघालेले असदुद्दीन ओवेसी कोपरगाव तालुक्यातील एका मशिदीमध्ये रात्री मगरिबची नमाज पठणासाठी थांबले. मात्र, त्या भागातील नागरिकांनी ओवेसीना ओळखलेच नाही.नमाज झाल्यानंतर अनेकांनी 'आपको कही देखा है' म्हणत गर्दी केली. काही वेळानंतर सोबत असलेले एका व्यक्तीने हे 'ओवेसी साहब है' असे सागितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.

बातम्या आणखी आहेत...