आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:अशोकनगरला एकाच इमारतीत तीन चाेऱ्या ; लाखो रुपयांचे ऐवज लंपास

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर परिसरात घरफोडीचे सत्र सुरू असून अशोकनगर परिसरातील वसंत वन विहार इमारत येथे बंद असलेल्या तीन घराचे कुलूप तोडत अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. जाधव संकुल येथे अहिल्याबाई होळकर चौकातील इमारतीत राहणारे सिराज नायर, मच्छिंद्र भदाणे व तिसरे भाडेकरू (नाव समजले नाही) बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत शनिवारी रात्री दोन ते चारच्या दरम्यान या इमारतीतील सर्व घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या. त्यानंतर तीन घरांच्या दर्शनी भागांचे कुलूपे तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे, सोफासेट, किचनमधील भांडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त करत देवघरातील चांदीचे देव तसेच कपाटातील दागिने व रक्कम असा ऐवज लुटून नेला.

बातम्या आणखी आहेत...