आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:अश्विनी सरदेशमुख रोटरी सुपरस्टार ; राज्यस्तरीय गायन स्पर्धेत पटकावले विजेतेपद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ नाशिकरोडच्या अश्विनी सरदेशमुख यांनी नागपूर येथे रोटरी सुपरस्टार सिंगिंग कंटेस्टच्या ग्रँड फिनालेमध्ये महिला श्रेणीमध्ये प्रतिष्ठित रोटरी सुपरस्टार पुरस्कार जिंकला. तर नशिकरोड क्लबच्याच रोटेरियन राजेश दाणी यांनी पुरुष गटात उपविजेतेपद पटकावले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० इगतपुरी ते नागपूर ही एक प्रतिष्ठित स्पर्धा हाेती. या स्पर्धेचा अंतिम सामना नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे पार पडला. डिस्ट्रिक्टमधील उत्कृष्ट गायकांमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात १०० हून अधिक गायकांनी भाग घेतला. अंतिम सामन्यात अश्विनी यांनी लागोपाठ तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार जिंकला. ऑल इंडिया रेडिओच्या सीनिअर आर्टिस्ट श्रद्धा भारद्वाज आणि कोलकाता येथील पार्श्वगायिका शर्मिष्ठा झा यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. रोटरी जिल्हा ३०३० च्या प्रथम महिला मोनिका झुनझुनवाला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डाॅ. निकुंज पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...