आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करतील,  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची टीका

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका केली जात आहे. मात्र, आमदारांना घोडे म्हणण्याचे काम फक्त गाढवच करू शकतो, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच श्रीजी होम या प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के मालकी असून श्रीजी आर्थिक प्रकरणाची चाैकशी व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत केली.

सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ‘सामना’ या वर्तमानपत्रात आमदारांच्या घोडेबाजाराबाबत आलेली माहिती निवडणूक आयाेगाला देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच याबाबत निवडणूक आयाेगाने मुख्यमंत्री व सामनाच्या संपादकांचे स्टेटमेंट घ्यावे आणि पुढील कारवाई करायला हवी. त्याचबरोबर शिवाजी पार्क येथे उभी असलेली श्रीजी होम इमारत काेणाची आहे? त्या इमारतीबाबची सर्व कागदपत्रे ईडीकडे दिली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्रीजी होम्स बनवण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांची सोमय्यांना कांदा भेट : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या एका शेतकऱ्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांना कांदा भेट देत याप्रश्नी केंद्र सरकारने लक्ष देण्याची विनंती केली. तरुण शेतकरी रोहित महाजन भाजप कार्यालयात कांदा घेऊन आल्याने या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महाजनने सोमय्यांना कांदा भेट दिला.

बातम्या आणखी आहेत...