आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:वाहतूक पोलिसाला मारहाण; विनाहेल्मेट कारवाई केल्याचा रागातून पोलिसाला मारहाण करणाऱ्यास कोठडी

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनाहेल्मेट कारवाई केल्याचा रागातून वाहतूक पोलिसाला आणि पोलिस ठाण्यातील पोलिसांना मारहाण करणाऱ्या दुचाकीचालकाची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. रितेश अशोक ललवाणी (रा. यश व्हिला, मधुकरनगर, सावरकरनगर, गंगापूररोड) असे या दुचाकीचालकाचे नाव आहे. सोमवारी (दि. २०) तरणतलाव सिग्नल येथे हा प्रकार घडला होता.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि साहेबराव गवळी (नेमणूक वाहतूक शाखा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी ११.३० वाजता जलतरण तलाव सिग्नल येथे कर्तव्य बजावत असताना संशयित दुचाकीचालक विनाहेल्मेट एमएच १५ एफएक्स ०९९० या क्रमांकाचे दुचाकी वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. गवळी यांनी वाहन थांबवत बाजूला घेण्यास सांगितले. विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याने दंड भरण्यास सांगितले.

संशयिताने नकार दिला. गवळी हे इ- मशिनवर पेंडिंग दंड टाकण्यासाठी फोटो काढत असताना संशयित ललवाणी याने फोटो का काढता म्हणून वाद घातला. गवळी यांना शिवीगाळ करत इ-चलन मशीन हिसकावून घेत रस्त्यावर आपटून फोडून टाकले. गवळी यांनी संशयिताला पोलिस वाहनातून सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. येथे कर्तव्यावर असलेले शिपाई योगेश वायकंडे यांना रॉडने मारहाण केली. ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. संशयिताला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ निरिक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...