आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नामको'ला गत वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार पूर्ण:चेअरमनपदी निवड झाल्यानंतर वसंत गिते यांचे प्रतिपादन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामकाे बँकेच्या चेअरमनपदी माजी आमदार वसंत गिते यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करतांना मावळते चेअरमन हेमंत धात्रक, ज्येष्ठ संचालक साेहनलाल भंडारी समवेत इतर संचालक. - Divya Marathi
नामकाे बँकेच्या चेअरमनपदी माजी आमदार वसंत गिते यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करतांना मावळते चेअरमन हेमंत धात्रक, ज्येष्ठ संचालक साेहनलाल भंडारी समवेत इतर संचालक.

प्रशासकीय काळात झालेल्या चुकीमुळे आम्ही बँकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे की नाही, हा मोठा प्रश्न होता. मात्र सुमारे 1 लाख 80 हजार सभासदांचे भवितव्य लक्षात घेऊन आम्ही बँकेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला. सोहनलाल भंडारी, विजय साने, हेमंत धात्रक यांच्या चेअरमनपदाच्या काळात बँकेचा एनपीए 38 टक्क्यांवरून केवळ 4 टक्क्यांवर आला आहे. ही प्रगती आम्ही सर्व संचालक मंडळ व बँकेचा सेवकवर्ग व सभासदांच्या विश्वासामुळे झाल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित चेअरमन माजी आमदार वसंत गिते यांनी केले.

दि. नासिक मर्चन्ट्स को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी वसंत निवृत्ती गिते यांची बुधवारी एकमताने निवड करण्यात आली यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करती हाेते. चेअरमनपदासाठी गिते यांच्या नावाची सुचना चेअरमनपदाची सूचना ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी यांनी मांडली. त्यास संचालक विजय साने यांनी अनुमोदन दिले.

सातपूर येथील बँकेच्या मुख्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. यावेळी बँकेच्या संचालकांसह सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत गिते 1994 पासून नामको बँकेवर संचालक म्हणून कार्यरत असून त्यांची तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड झाली आहे.

यावेळी सोहनलाल भंडारी, विजय साने, हेमंत धात्रक यांनी कमी बोलणे आणि जास्त काम करणे ही गिते यांची हातोटी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या काळात बँक प्रगतीचे शिखर गाठेल असा विश्वासही व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रकाश दायमा यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, सुनील बागुल, विनायक पांडे, यतीन वाघ, सुधाकर बडगुजर, निवृत्ती अरिंगळे, अजय बोरस्ते, बंडू बच्छाव, समीर शेटे, सचिन मराठे, जयप्रकाश जातेगावकर, विलास शिंदे, डी. के. जगताप, संजय चव्हाण, दिनकर आढाव,यांसह संचालक उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...