आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवजात निराधार बालकांचे आधाराश्रमसारख्या सेवाभावी संस्था मातेच्या मायेने सांभाळ करतात. पण, त्यांना हक्काचे कुटुंब, आईवडील मिळायला हवेत. यासंदर्भात संबंधित सर्व घटकांनी संवेदनशीलपणे परस्पर समन्वय साधला पाहिजे. आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्यात राज्यात सर्वप्रथम नाशिकमधून नुकतेच आठ महिन्यांचे बाळ दत्तक गेले आहे याचे समाधान आहेच. आगामी काळात २४ बालके या रांगेत असून त्यातील २ बालके लवकरच दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे प्रतिपादन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी असे प्रतिपादन केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. ११) आधाराश्रम येथे आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्याच्या औचित्याने पोस्टर प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते.
आधाराश्रमाचे समन्वयक राहुल जाधव यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव हेमंत पाठक यांनी स्वागत केलेे. यावेळी बालकल्याण समिती सदस्य गोपाळ शिंपी, अॅड. भास्कर मोरे, गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला परिविक्षा अधिकारी प्रभाकर गावित, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, परीवेक्षिका शीतल गायकवाड, पुष्पा वाघ, सुज्ञा खरे तसेच संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या दीपाली पालेकर, प्रणाली पिंगळे, तृप्ती मकवाना यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुवर्णा जोशी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.