आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सहकार विभागाचे सहायक निबंधक एकनाथ पाटील यांना गुरुवारी (२ मार्च) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्याच कार्यालयात १५ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.पाथरे येथील एका पतसंस्थेच्या सेवकाने थकीत १७ कर्जदारांचे १०१ चे वसुली दाखले मिळण्यासाठी पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते. पाटील यांनी प्रत्येक प्रस्तावाचे २ हजार याप्रमाणे ३४ हजारांची मागणी संबंधित सेवकाकडे केली होती. तडजोडीनंतर २५ हजार ५०० रुपये देण्याचे संबंधित तक्रारादराने मान्य केले. ठरल्याप्रमाणे २६ फेब्रुवारीला पहिल्या हप्त्याचे १० हजार रुपये पाटील यांना देण्यात आले होते. दाखले तयार झाल्यानंतर उर्वरित १५ हजार ५०० रुपये देण्यात येणार होते.
मात्र सेवकाने त्यानंतर पैसे दिले नाही, त्यामुळे पाटील यांनी दाखल्यांवर सही करण्यास थेट नकार दिला. त्यानंतर पैसे देण्याची इच्छा नसलेल्या संबंधित एका पतसंस्थेच्या सेवकाने बुधवारी (१ मार्च) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटीलच्या निबंधक कार्यालयात सापळा रचला. सेवकाने पाटीलला पैसे देताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याला अटक करत पुढील कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.