आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतपार्टी, तमाशा कलावंतांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार:संगीत पार्टी, तमाशा कलावंत महासंघाला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांचे आश्वासन

नाशिकएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

राज्यातील तमाशा, लावणी लोककलावंतांच्या मागण्या शासनदरबारी सोडवाव्या या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाने दिले. देशमुख यांनी तत्काळ सचिवांसह लवकरच बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे अश्वासन महासंघाच्या शिष्टमंडळाला दिल्याचे महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांनी सांगितले.

काेराेना काळात संगीत पार्टी आणि तमाशा कलावंतांचे खूप हाल झाले. अजूनही अनेक कलावंतांचा संघर्ष सुरूच आहे. लाेककलावंतांसाठी असेलेले पॅकेज जाहीर झाले मात्र अनेकांना त्याची रक्कम मिळालीच नाही. तसेच शासनाने जाहीर केलेले अनुदानही अनेकांपर्यंत पाेहाेचलेले नाही. अजूनही अनेक गाव पाड्यांवरील यात्रा, जत्रा, महाेत्सव सुरू न झाल्याने संगीत पार्ट्या, तमाशा यांचे कार्यक्रम बंदच असल्याने तमाशा कलावतांचा जगण्यासाठी संघर्ष सुरूच असल्याने शासन दरबारी कलावंतांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली.

यावेळी देशमुख यांनी लवकरच आपण सचिवांसह बैठक घेऊन सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी संगीत बारी करणाऱ्या उषा पिंपळगावकर, पुष्पा कलंबकर,वैशाली वाफळेकर, शारदा आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.

या आहेत मागण्या

 • कोविड मदत अनुदान ताबडतोब वाटप व्हावे,
 • राज्यातील पारंपरिक संगीतबारी पार्ट्यांचे कोविड अनुदान प्रस्ताव मंजूर करावेत,
 • लोककला आर्थिक पॅकेज बंद झाले ते सुरू करावे.
 • 100 कोटींचे लोककलावंतासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे.
 • कलावंतांसाठी पुणे येथे घरकुलसाठी 5 एकर जमीन द्यावी.
 • कलावंत कोट्यातून विधानपरिषदेवर सदस्यत्व मिळाव.
 • राज्यातील सर्व आठवडा बाजार, यात्रा लवकर सुरू कराव्यात.
 • वृद्ध कलावंतांसाठी 5 हजार सरसकट मानधन सुरू करावे.
 • वसंतराव नाईक व अण्णाभाऊ साठे आर्थिक मंडळावर प्रतिधिनित्व मिळावे.
 • सांस्कृतिक खात्यांतर्गत असणाऱ्या सर्व कमिटीवर लावणी, तमाशा लोककलावंत यांनाच प्रतिनिधित्व मिळावे.
बातम्या आणखी आहेत...