आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावस्तुंच्या प्रत्यक्ष खरेदीशिवाय बनावट कंपन्यांकडून ३७.२४ कोटी रुपयांची खोटी बिले घेऊन ६.७० कोटी रुपयांची वजावट प्राप्त करून करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन करुन वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी न करता बिजके किंवा बिले स्वीकारून शासनाची मोठया प्रमाणात महसूल हानी केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी अस्तित्व मेटल्सचे मालक व करदाने सुनिल अमृतलाल तुलसानी यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या नाशिक कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत करचुकवेगिरीसाठी शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नाशिक यांच्या न्यायालयाने १४ दिवसांपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणान्या करदात्यांविरुध्द महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या नाशिक कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत में अस्तित्व मेटल्सच्या तपासणीदरम्यान अस्तित्व मेटल्स चे मालक सुनिल अमृतलाल तुलसानी यांनी हवाला करदात्याकडून कर वजावटीचा दावा केला आणि प्रत्यक्षात विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केल्याचे समाेर आले हाेते.
हि अटकेची कार्यवाही नाशिक विभागाचे राज्यकर सहआयुक्त हरिंश्चंद्र हिरामण गांगुर्डे यांचे नेतृत्वाखाली राज्यकर उपायुक्त, अन्वेषण शाखा, नाशिकचे चेतन रा. डोके, यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. राज्यकर सहायक आयुक्त योगेंद्र आर. पाटील, संतोष पी. सुर्यवंशी व डॉ धर्मनाथ एम. रोटे यांनी राज्यकर निरीक्षक व कर सहायक यांसह अंमलात आणली. नाशिक क्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त सुभाष ऊमाजी एंगडे यांचे विशेष मार्गदर्शनाखाली हि अटक करण्यात आली.
या वर्षातील ही ५३ वी कारवाई
महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभागाने खोटया कर वजावटीचा दावा करणाच्या व खोटी बिजके देऊन कर चुकवेगिरी करण्यान्या करदात्यांना या कार्यवाहीतून गंभीर इशारा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागामार्फत राबविण्यात आलेल्या मोहिमेअतंर्गत ही या वित्तीय वर्षातील ५३ वी कारवाई आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.