आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर पाेलिसांची कारवाई:पाथर्डी फाटा येथे तलवारीसह हत्यारे बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात खून व प्राणघातक हल्यांची मालिका सुरूच असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच पाेलिसांकडून आता गुन्हेगारी नियंत्रणासाठी दिवसा व रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीपथकालाच पाथर्डी फाटा परिसरात तीन युवक संशयास्पद हालचाली करताना दिसून आले असता त्यांना ताब्यात घेत दाेन तलवाींसह धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले. या तिघांना इंदिरानगर पेालिसांनी अटक केली असून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 4) रात्रीच्या सुमारास तीन तरूण गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस पथकाने संतोष कॅफे हॉटेल जवळील शाळेसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तिघांना हटकले. त्यांच्यकडे चाैकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्याचवेळी एक पळण्याच्या तयारीत असताना त्याला आणि इतर दोघांनाही पाेलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यात एकाच्या कंबरेला लाेखंडी धारदार तलवार खाेचलेली आढळून आली. तर दाेघांच्या कंबरेला आणखी दाेघे हत्यार दिसून आली.

तिघांना अटक करुन त्यांची पोलिसांनी कसुन चाैकशी केली असता, संशयित सागर बबन जाधव, (रा. घोटी), विकास तानाजी घोटे (रा. रायगडनगर), उमेश साईनाथ बोंडे (रा. टिटोली, इगतपुरी) अशी त्यांची नावे आहेत. या संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...