आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचा इज ऑफ लिव्हिंग:जुनी मालमत्ता खरेदीवेळीच वीज मीटरही नावावर ; खरेदीदारांची धावाधाव हाेणार बंद

नाशिकरोड / सचिन वाघ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावाधाव बंद होणार आहे. आता हे कनेक्शन आपोआपच नवीन घर मालकाच्या नावावर होणार आहे. यासाठी महावितरणने इज ऑफ लिव्हिंग हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची महावितरणने ऑक्टाेबर महिन्यात चाचणी घेतली हाेती. ती यशस्वी झाल्याने आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.

एखाद्या व्यक्तीने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केल्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी स्वंतत्र अर्ज करावा लागत होता. तसेच या बदलासाठी महावितरणकडे अर्ज आणि कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात होती. परंतु महावितरणने यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध केली असून ऑनलाइन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड केली जात होती, प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. त्यासाठी नागरिकांना सतत पाठपुरावा करावा लागत होता.

मुद्रांक शुल्क, नोंदणी विभागाशी जाेडली महावितरणची आयटी सिस्टिम नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडण्यात आली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महावितरणला याबाबत मेसेज येतो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्याबाबत सांगितले जाते. हे शुल्क नागरिक आता घरात बसून देखील ऑनलाइनही भरू शकतो. फी भरल्यानंतर विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नवीन मालकाच्या नावाने पाठविले जाते. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्सफर करायचे याची देखील निवड करण्यास सांगितले जाते.

महावितरणची चाचणी यशस्वी
या संदर्भात महावितरणनेे चाचणी घेतली होती, ती यशस्वी झाल्याने हा उपक्रम आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. ग्राहकांना वीज कनेक्शन आपोआप बदलून मिळण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून आता नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...