आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक ज्याेतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचे दर्शन यंदा सुखकर हाेतआहे. देवस्थानने यासाठी अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण दर्शन मंडपाची उभारणी केलीआहे. वातानुकूलित असलेल्या या मंडपात पाच हजार भाविक एकाच वेळी उभे राहू शकतील. विशेष म्हणजे, पिण्याचे शुद्ध पाणी, बसण्याची सुविधा येथे करून देण्यातआल्याने भाविकांना सुलभतेने दर्शन घेता येतआहे.
काेराेनानंतर दाेन वर्षांनी मंदिर उघडल्या नंतरच्या पहिल्या श्रावणी सोमवारी लाखावर भाविक त्र्यंबकनगरीत हाेते. या गर्दीमुळे रांगेतील भाविकांना चार ते सहा तासांचा वेळ दर्शनासाठी लागत हाेता. पेड दर्शनही काही वेळा बंद करावे लागले हाेते. तरी देखिल १३ लाखांचे उत्पन्न देवस्थानला मिळाले. याचाच अर्थ 6500 हजार भाविकांनी पेड दर्शनाचा लाभ घेतला. याच्या किमान तीन पट भाविक दर्शन बारीतून दर्शन घेतात. यामुळे बहुसंख्य भाविकांसाठी उभारलेल्या या सुविधा लाभदायक ठरतआहेत. या दर्शनबारीतून एका तासाला साधारणत: 1500 ते 1700 भाविक गाभाऱ्यातून दर्शन घेतात.
अशी आहे दर्शनबारी
2500 भाविक क्षमता असलेले दाेन कंपार्टमेंट
20 ठिकाणी दर्शनासाठी टीव्ही
8 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची साेय 8 ठिकाणी बाहेर पडण्याचे मार्ग
दर्शनासाठी वेळ अशी
श्रावणी सोमवारी - पहाटे 4 ते रात्री 9
इतर दिवशी - पहाटे 5 ते रात्री 9
महाप्रसादाची व्यवस्था तूर्तास नाही
देवस्थानकडून तूर्तास कोणतीही महाप्रसादाची व्यवस्था केली गेलेली नाही. मात्र, येत्या काही महिन्यात ती उपलब्ध हाेऊ शकेल. यासाठी शिवप्रसादालयाचे काम वेगाने सुरूआहे. खडीसाखरेचा प्रसाद भाविकांना देण्याच्या संदर्भात नियोजन सुरू असल्याचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.