आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खेळाडूंमध्ये मानसिक कणखरता हवी ; रणजीपटू सत्यजित बच्छाव यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद‌्घाटन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही क्रीडाप्रकारात यशस्वी होण्यासाठी मानसिक कणखरता अत्यंत महत्त्वाची असते. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही कुठलेही यश मिळवू शकता. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी युवा खेळाडूंना विविध स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम संधी असते, असे प्रतिपादन रणजीपटू सत्यजित बच्छाव यांनी मीनाताई ठाकरे स्टेडियमवर आयोजित कै. भाई वडके चषक- २०२२ या अंडर-१२ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. एन. एस. एन. क्रिकेट अकॅडमीतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे हे द्वितीय वर्ष आहे. प्रत्येकी २५-२५ षटकांचे सामने ८ दिवस साखळी पद्धतीने खेळवले जाणार असून आठ संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे. खेळाडूंनी आपली शारीरिक स्थिती मजबूत ठेवून यश मिळण्यासाठी संयम ठेवावा, असे मार्गदर्शनदेखील सत्यजित बच्छाव यांनी केले. क्रीडा विभागाचे अधिकारी अरविंद चौधरी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जिल्हा संघाचे माझी अष्टपैलू कर्णधार मनोज परदेशी, एसडब्ल्यू क्रिकेट संघाचे कार्यकारी अध्यक्ष शंतनू वेखंडे यांनी कै. भाई वडके यांच्या स्मृतीस उजाळा दिला. विजेत्या संघास तीन हजार रोख आणि द्वितीय संघास अडीच हजार रोख पारितोषिक असून स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज असे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रशिक्षक मंगेश निरभवणे, शंतनू वेखंडे, यतेंद्र कार्लेकर, रितेश तिडके समितीचे कामकाज बघत आहे.

बातम्या आणखी आहेत...