आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी फसली:नाशिकमधील विल्होळीतील महाराष्ट्र बँकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; रोकड न निघाल्याने तोडफोड

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहर व परिसरात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच असून, घटना राेखण्यात शहर पोलिस अपयशी ठरत असताना पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीलगत विल्हाेळी गावातील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम फाेडण्याची घटना गुरुवारी (१६ जून) पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना बॅंकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चाेरट्यांना मशीनमधून राेकड न काढण्यात आल्याने त्यांचा चाेरीचा डाव फसला. त्यांनी यंत्राची ताेडफाेड करीत नुकसान केले आहे.

गुन्हा दाखल

आठवडयाभरापूर्वीच सिडकाेत एटीएम फाेडण्याचा प्रकार उघडकीस आला हाेता, या घटनेपाठोपाठ विल्हाेळी येथे घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने एटीएममधील राेकड चाेरट्यांना काढता न आल्याने ती शाबूत राहिली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसराची पाहणी केली. विशेष म्हणजे, विल्होळी येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखेजवळच हे एटीएम असून सीसीटीव्ही कॅमऱ्यात हा सर्व प्रकार दिसून आला आहे.

एटीएमचे नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी एटीएम यंत्राची तोडफोड करत नुकसान केले आहे. पहाटेच्या सुमारास दोन ते तीन तरुणांनी दुचाकीवरून येऊन केंद्राबाहेर गाडी लावून आत घुसले. तिघांपैकी एक बाहेर थांबून दाेघे आत घुसले. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी याच फुटेजच्या आधारे पेालिस चाेरट्यांचा शाेध घेत आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी नजीकच विल्हाेळी पोलिस चाैकी असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घातली असती तर कदाचित चाेरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असते, असेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...