आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या संशयितांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात एका पाठोपाठ 7 संशयितांना अटक केली असूनया गुन्ह्याच्या तपासासाठी एटीएसला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
तपासाला 90 दिवसांचा कालावधी पूर्ण
एटीएसच्या मुंबई व नाशिक पथकाच्या संयुक्त कारवाईत अटकेतील संशोधकांच्या तपासाला 90 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा अवधी मिळावा यासाठी तपासतकाने न्यायालयाकडे अर्ज दाखल केला असता त्यावर मंगळवारी सुनावणी पूर्ण करण्यात आली.
22 सप्टेंबरला छापासत्र
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली राज्यात दहशतवादविरोधी पथकाच्या नाशिक पथकाने सुरुवातीस 22 सप्टेंबर रोजी छापासत्र राबवून मालेगाव, पुणे, बीड व कोल्हापूर येथून पाच संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या पाच संशयितांचे मोबाईल व लॅपटॉप फॉरमॅट करून देणाऱ्यास तर संशयितांच्या संपर्कात असलेल्या सहाव्या संशयितास नोव्हेंबर महिन्यात अटक केली.
तपासाला मुदतवाढ देण्याची विनंती
या गुन्ह्याचा तपास सुरु असून याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत संपत होती. त्यामुळे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी (दि. 20) युक्तीवाद करत तपासास मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यात संशयितांकडून जप्त केलेल्या मोबाइल, लॅपटॉपमधील फॉरेन्सिक तपास प्रलंबित असून त्यातील डाटा मिळवणे बाकी आहे. इतर अनुषंगाने तपास बाकी असून संशयितांबद्दलही तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे ॲड. मिसर यांनी तपासास 90 दिवसांची वाढ मागितली होती.
बचाव पक्षाची हरकत
बचाव पक्षाच्या वतीने अॅड. अन्सारी यांनी त्यास हरकत घेत तपासी पथकाकडून मुद्दामून वेळ काढू पुन्हा केला जात असल्याचा आरोप करीत तपास पूर्ण झाल्याने मुदतवाढ देऊ नये अशी मागणी केली. तब्बल दोन तास चाललेल्या सुनावणी नंतर न्यायालयाने एटीएसला तपासासाठी 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
अटकेतील संशयितांची नावे
मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी . मालेगाव, पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (48), रझी अहमद खान. कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला. सुभाषनगर, कोल्हापूर), उणेस उमर हयाम पटेल, जळगाव, इरफान दौलत खान नदवी उर्फ मौलाना इरफान खानगुलशेरनगर, मालेगाव यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.