आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरी पंडितांवरील हल्ला प्रकरण:पाकिस्तानी ध्वजाला जोडे मारत आंदोलन; अमित शाहांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेची मागणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मिरी पंडित वर होणाऱ्या हल्ला विरोधात शिवसेनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामाची मागणी करत पाकिस्तान राष्ट्र ध्वज आणि अतिरेकी प्रतिमा ला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.सोमवार दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता पंचवटी कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी.गृह मंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा एकदा काश्मीर मधील हिंदू पंडीतावर अतिरेकी हल्ले होत आहेत,त्यात अनेक हिंदू वर भरदिवसा गोळ्या घालून हत्या होत आहेत,370 कलम हटवून उदो उदो करणार्या भाजपाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना सदर प्रकरण हाताळता आले, नाहीत, काश्मीर मध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले, असून काश्मीर मधील हिंदू दहशीत जगत आहेत, व अनेक हिंदू पुन्हा काश्मीर सोडत आहेत, अशे असताना देशाचे गृहमंत्री मात्र आय.पी.लचे सामने बघण्यास व्यस्त आहेत, स्वताला हिंदूचे सरकार म्हणार्या भाजप शासीत सरकारने या होणार्या हल्ल्याबाबत जनतेला उत्तर द्यावे..व तातडीने काश्मीर मध्ये अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यावे..

या मागणीसाठी नाशिकमधील शिवसेना पंचवटी विभागाचे वतीने पंचवटी कांरजा येथे आंदोलन करण्यात आले,तसेच पाकिस्तान राष्ट्रध्वज, अतिरेक्यांचा पुतळाला चप्पल जोडो मारो आंदोलन करण्यात आले...

विधानसभाप्रमुख योगेश बेलदार, सुनील जाधव, महानगर संघटक दिगंबर मोगरे, विशाल कदम, उपमहानगरप्रमुख सुनिल जाधव, अमोल सूर्यवंशी, शैलेश सूर्यवंशी, सुनील निरगुडे, शिवसेना महिला आघाडी शोभा मगर, मंगला भास्कर, मनिषा हेकरे, शोभा गटकळ, ज्योती देवरे,

संजय थोरवे, महेंद्र बडवे, हर्षद पटेल, युवासेनेचे रूपेश पालकर, वैभव खैरे, संजय पिंगळे , सचिन धोंडगे , बब्बू गोसवी, संदीप लभडे, राहुल देशमुख, पोपट शिंदे, जगन गोरे, युवासेनेचे कल्पेश पिंगळे, महेश मते, प्रमोद घोलप, योगेश गांधी,शोभा दिवे, ज्योती कुमावत,भारती बोढाई,आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...