आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेने जप्त:अट्टल घरफोड्या ‘गेट अॅनालिसीस’द्वारे जेरबंद; उंची राहणी, संशयाला हुलकावणी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत उंच राहणीमान असल्याने त्याच्यावर काेणताही संशय पाेलिसांना घेता येत नव्हता. अशा उंची राहणीतच ताे बंद घर हेरून कटावणीच्या साह्याने घराच्या दाराचे लाॅक ताेडून चाेरी करून जाताना घराचा दरवाजा आणि ताेडलेले लाॅकही बराेबर घेऊन जात असल्याने तपासात अडथळा निर्माण हाेत हाेता. मात्र घरफोडीच्या ठिकाणी प्राप्त सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्यक्तींची गेट अॅनालिसीस प्रणालीच्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि हा उंची राहणीमान असलेला संशयित पाेलिसांना पकडण्यात यश आले. रिजवान मलंग शहा (२३, रा. कुरेशीनगर, वडाळानाका) असे त्याचे नाव आहे. त्याने अशाप्रकारे चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे संशयिताचे यापूर्वीचे कुठलेही रेकाॅर्ड पोलिसांत नव्हते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंुबईनाका पोलिस घरफाेडीचा तपास करत असताना रेणुकानगर परिसरातील घरफोडीच्या ठिकाणी एक संशयित सीसीटीव्हीत कैद झाला होता. पाेलिसांनी त्याच्या वर्णनावरून माग काढत त्याला वडाळारोड येथे ताब्यात घेतले. संशयिताकडून १३ तोळे सोन्याचे दागिने असा सहा लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहाेकले, के. टी. रौंदळ, सोमनाथ गेंगजे आणि पथकाने ही कारवाई केली.

असे आहे गेट अॅनालिसीस गेट अॅनॅलिसिसमध्ये सीसीटीव्हीमधील व्यक्तीचे वर्णन उंची, जाडी, चालण्याची पद्धत आणि चेहरा याची सर्वप्रकारे माहिती मिळते. त्याच्या आधारे पोलिस अशा वर्णनाच्या व्यक्तींचा शोध घेतात. त्या व्यक्तींवर पथकांद्वारे पाळत ठेवली जाते. सीसीटीव्ही फुटेज आणि संशयिताचे वर्णन मॅच झाल्यानंतर संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...