आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारच्या सुटीची पर्वणी साधत आयमातर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित औद्योगिक प्रदर्शन बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. नाशिकचा स्वाभिमान समजल्या जाणाऱ्या एचएएलकडून येथे मांडण्यात आलेली सहा फुटांची सुखाेई विमानाची प्रतिकृती प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. हिरानंदानी ग्रुपचा औद्योगिक हब सिन्नर तालुक्यात येणार असे समजल्यानंतर राज्य आणि देशातील मान्यवर उद्योजकांनी या ग्रुपशी संपर्क साधून या हबमध्ये जागा देण्याची विनंती केल्याने प्रत्यक्षात तेथील गुंतवणूक दाेन ते तीन हजार कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, बीएसएनएलचे महासंचालक नितीन महाजन, एबीपीचे रवींद्र कोल्हे, कृषीकुमार जगताप, योगेश पोतदार, अतुल कुलकर्णी, एचएएलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सुभाष घरापुरे, मुख्य व्यस्थापक प्रदीप शेटे, राजीवकुमार, जावेद अली, संजयकुमार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, एपिरॉकचे प्रकल्पप्रमुख अरविंद पाटील एबीबी लिमिटेडचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे, शिरीष नागनाथ आदींनी प्रदर्शनास भेट दिली. आयमाच्या पुढाकाराने नाशकात मोठे प्रकल्प येत असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत चेंबरचे पदाधिकारी सुधाकर देशमुख, विजय बेदमुथा, आशिष नहार, उमेश वानखेडे, कैलास पाटील आदी होते. प्रदर्शनाला निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर सारस्वत बँकेचे रोहित भुजबळ, दामोदर देशपांडे, अभिनव कोतवाल, भास्कर कोतवाल, नितीन कोतवाल आदींनी भेट दिली. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
गुंतवणुकीसाठी करार होणार
येत्या काही दिवसात प्रदर्शनातच गुंतवणुकीचे आणखी परस्पर सामंजस्याचे करार होणार असून त्याद्वारे नाशिककरांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील, असा विश्वास प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी व्यक्त केला. प्रर्दशनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बिझनेस टु बिझनेस मिटिंग्ज
बी टू बी अंतर्गत विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी बिझनेस टू बिझनेस मिटिंग्ज हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असून त्या अंतर्गत आज एबीबी, एचएएल, कमिन्स इंडिया (पुणे), टाटा टेक्नॉलॉजिस्ट (पुणे), सुला वाइन्स, एएसबी इंटरनॅशनल (मुंबई)च्या पर्चेस, आउटसोर्सिंग, स्ट्रॅटेजिक सोर्सिंग आदी विंगच्या अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन उद्योजकांच्या उत्पादनाचे कौतुक केले. नाशकातील दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी तसेच त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली
प्रदर्शनाला भेट देण्याची संधी दवडू नका
गेल्या दोन दिवसांत प्रदर्शन बघण्यास झालेली तोबा गर्दी बघता उद्योजक आणि आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.हे प्रदर्शन आणखी दोन दिवस लोकांना बघण्यासाठी खुले असून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्यांची उत्पादने, नवोदित उद्योजकांचे नावीन्यपूर्ण कलाविष्कार बघण्याची संधी दवडू नका. - निखिल पांचाळ, अध्यक्ष, आयमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.