आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामपंचायत निवडणूक:ग्राम पंचायत बिनविरोधसाठी खेळी, मंदिरासाठी 2 कोटींची बोली; नाशिक जिल्ह्यातील उमराणे गावातील प्रकार

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘व्हायरल’ झालेल्या क्लिप्स आणि चर्चांना अधिकृत पातळीवरून कोणताही दुजोरा मिळालेला नाही

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील उमराणे येथील ‘रामेश्वर’ मंदिर जीर्णोद्धारासाठी तब्बल दाेन कोटी पाच लाखांची ‘लिलाव बोली’ जिंकणाऱ्या पॅनलला बिनविरोध निवडून देण्याची खेळी’ सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली आहे. यासंदर्भात ‘व्हायरल’ झालेल्या क्लिप्स आणि चर्चांना अधिकृत पातळीवरून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. परिणामी, याबाबतची स्पष्टता उमेदवारी अर्ज भरण्याची (दि.३०) मुदत संपुष्टात आल्यावरच होणार आहे. उमराणे ग्रामपंचायतीत १७ जागांसाठी निवडणूक हाेत आहे. शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार निवडून येणाऱ्या सदस्यांमधूनच बहुमताने सरपंच निवडला जाणार आहे. परंतु निवडणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. दरम्यान, सरपंचपदाचा लिलाव वगैरे झाल्याच्या चर्चा या बिनबुडाच्या असल्याचा दावा प्रशांत विश्वासराव देवरे व ग्रामस्थांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...