आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंनिसच्या पदाधिकाऱ्यांची निवड:महाराष्ट्र अध्यक्षपदी अविनाश पाटील, कार्याध्यक्षपदी माधव बावगे बिनविरोध

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच औरंगाबाद येथे रविवारी 5 जून रोजी उत्साहात पार पडली. संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी अविनाश पाटील, कार्याध्यक्षपदी माधव बावगे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

राज्य उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे यांची फेरनिवड झाली. डाॅ. ठकसेन गोराणे यांची प्रधान सचिव पदी सहमतीने निवड करण्यात आली आहे. येथील प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समन्वयक, तर कृष्णा चांदगुडे यांची जातपंचायतींना मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. संघटनेच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे सह व्यवस्थापक म्हणून नाशिक रोड येथील राजेंद्र फेगडे यांना संधी देण्यात आली.

कृष्णा चांदगुडे लिखित 'जातपंचायतींना मूठमाती' या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीसह, संघटनेच्या अन्य तीन कार्यकर्त्यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन शिक्षक आमदार विक्रम काळे व ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. जयदेव डोळे यांच्या हस्ते करण्यात आले. समारोप सत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या लक्षवेधी कामाचे कौतुक केले जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...