आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील आझाद मैदानात उपोषण:2019 मधील एमपीएससी उत्तीर्णांना नियुक्तीची प्रतीक्षा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ रोजी झाली. तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही अद्यापही परीक्षा दिलेल्या या ११४३ उमेदवारांना शासनाने नियुक्तीच दिली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या या उमेदवारांनी थेट मुंबईतील आझाद मैदान येथे साखळी उपोषण सुरू केले आहे.दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन तत्काळ नियुक्ती देण्याबाबत त्यांना या परीक्षार्थींनी विनंती केली आहे.

एकीकडे शासनाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ७५ हजार बेरोजगारांना नाेकरीचे नियुक्तिपत्र देण्यासाठी राज्यात ३ नोव्हेंबरला जिल्हानिहाय नियुक्तिपत्र प्रदान साेहळ्याचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे या परीक्षार्थींना नियुक्तीची प्रतीक्षा असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण या विभागांकडे या उमेदवारांची शिफारसही झाली आहे. तरीही त्यांना नाेकरी मिळालेली नाही.

सरकारला जाग यावी
परीक्षा देऊन साडेतीन वर्षे उलटूनही नियुक्तीच दिली जात नसेल, तर परीक्षा घेण्याचा उपयोग काय? त्यामुळे आपल्या हक्कासाठी या उमेदवारांनी आझाद मैदानावरच उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळाल्याशिवाय ते थांबणार नाहीत. - अजय खांडबहाले, विद्यार्थी प्रतिनिधी

बातम्या आणखी आहेत...