आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:लोकमान्य टिळक, साठे यांच्या कार्याचा वक्तृत्व स्पर्धेद्वारे जागर

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूरराेड येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयाेजित वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी वाल्हारे (प्रथम), पुनम कांबळे(द्वितीय), अंजली हडस (तृतीय) या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका रेखा पवार होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक कुणाल गोराणकर पर्यवेक्षक रमेश बागूल उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक प्रमोद पाटील व संजय अहिरे यांनी टीळक व साठे यांचे जीवनचरित्र सांगितले. सूत्रसंचालन प्रकाश नरोडे यांनी तर आभारप्रदर्शन सुनील आहिरे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...