आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:प्रकाश कोल्हेंना शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल रविवारी पुरस्कार वितरण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाचे प्रकाशपर्व सामान्यांच्या जीवनात आणणारे मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश सुकदेव कोल्हे यांना रविवारी (दि. ६) ‘ज्ञानदूत’ पुरस्काराने २३ व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार इगतपुरी तालुका साहित्य मंडळ, इगतपुरी व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार आहे. मानवधन विद्यानगरीतील धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळा, पाथर्डी फाटा नाशिक येथे पाच व सहा नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलन होणार असून यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...