आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमध्ये एका ज्येेष्ठ उद्याेजकाने थेट एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात पत्र देऊन प्रत्येकी एक स्वच्छ, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम वर्ग-२ यांना राेख रक्कम व पुरस्काराने गाैरविण्याचा चंग बांधला आहे. हा एक अनाेखा प्रयाेग असून याकरीता त्यांनी थेट एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय, अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला पत्र दिले आहे.
या कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या पुरस्काराबाबत माहिती द्यावी, अर्जाचा नमुना तयार असून ज्यांचे अजे येतील त्यांची मुलाखत घेऊन पुरस्कार दिले जाणार आहेत. सातपूर येथील शंभर टक्के निर्यात उद्याेग असलेल्या जाेटाे अॅब्रासिव्ह या उद्याेगाचे मालक ज्येष्ठ उद्याेजक जयप्रकाश जाेशी यांनी हा नावीन्यपूर्ण पुरस्कार देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याकरीता त्यांनी विशिष्ट निधीही राखीव ठेवला असून राज्यातील हा पहिलाच निराळा प्रयाेग मानला जात आहे.
विशेष म्हणजे, जाेशी यांच्याकडून पाच वर्षांपूर्वी एमआयडीसीने उद्याेग विस्तारासाठी भूखंड देण्यासाठी काेट्यवधी रुपये भरून घेतले असतानाही वेगवेगळे चार भूखंड दाखवले. मात्र, पाच वर्षांत एकाही भूखंडाचा कब्जा दिलेला नाही. एमआयडीसीच्या कामाबद्दल त्यांनी वारंवार मुख्यालयात तक्रारीदेखील केलेल्या आहेत. त्यातच आता त्यांचा हा नवा प्रयाेग उद्याेगवर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
जर पुरस्कारसासाठी अर्जच नाही आला तर कारभार भ्रष्ट हे समजून घेता येईल
लाेकांना स्वच्छ व पारदर्शक कारभार मिळावा, इतरांनाही कळावे की येथेही चांगले कर्मचारी, अधिकारी आहेत त्यासाठी ही संकल्पना आहे. त्याला कितीत प्रतिसाद येताे हे बघणे खरेतर महत्त्वाचे ठरणार आहे. १ आॅगस्टला एमआयडीसीच्या वर्धापनदिन असताे. त्याच दिवशी हा पुरस्कार दिला जाणार आहे. जर काेणीच अर्ज केला नाही तर ये थे फक्त भ्रष्ट लाेक आहेत असा अर्थ नक्कीच निघेल. - जयप्रकाश जाेशी, ज्येष्ठ उद्याेजक, नाशिक
खरच पुरस्कारासाठी अर्ज येणार? उद्याेजकांचे लक्ष
खरं तर निमा किंवा आयमा यांसारख्या आैद्याेगिक संघटनांकडून अशा प्रकारे पुरस्कार देणे उचित ठरले असते. पण एमआयडीसीच्या कारभाराने पिचलेल्या जाेशी यांनी पुढे येत हा उपक्रम हाती घेतला असल्याने नवल व्यक्त केले जात आहे. महत्वाचे म्हणजे, स्वच्छ, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष अशा वर्गवारीत खरच किती अर्ज पुरस्कारासाठी येतात याकडे आता उद्याेजकांचेच लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.