आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:कुकिंगमध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल सीमा गवारे यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच अन्य संस्कृतीमधील रेसिपी आणि कुकिंगमध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिकमधील सीमा गवारे-पाटील यांना दिल्लीच्या मेरिट अवॉर्ड‌्स आणि बाजार संशोधन संस्थेच्या वतीने गुणवत्ता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री नेहा धुपिया यांच्या हस्ते आणि मेरिट अवॉर्ड‌्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिया पनवर यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.