आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:जयंत येवला यांना महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्कार प्रदान

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील रीसील इंडिया कंपनीच्या वतीने राज्यभरातील बांधकाम व्यवसायाला दिशा देणाऱ्या प्रमुख बिल्डर व डेव्हलपर्सचा गाैरव करण्यात आला. नाशकातील लायन्स कल्बचे माजी अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक जयंत येवला यांना महाराष्ट्रातील महाराष्ट्र उद्योग भुषण २०२२ हा मानाचा पुरस्कार पुणे येथील समांरभात प्रदान करण्यात आला.

सिनेअभिनेत्री व उद्योजक तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मूळचे सटाणा येथील येवला यांनी जमीन खरेदी विक्री व्यवसापासून सुरूवात करून अल्पावधीच बांधकाम व्यवसायात पर्दापण केले. ते नाशिक स्मार्ट सिटी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून ते सामाजिक उपक्रम राबवित असतात.

बातम्या आणखी आहेत...