आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:स्वराज्य तर्फे 75 जणांना पुरस्कार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वराज्य परिवाराच्या वतीने यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवानिमित्त नासिकरत्न, समाजभूषण तसेच आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक असे एकूण ७५ जणांना ‘राज्यस्तरीय पुरस्काराने’ गौरवण्यात आले. प्रामुख्याने क्रांतिवीर राघोजी भांगरे, जननायक बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक स्मारकाची उद्घोषणा करण्यात आली. म्हसरूळ येथे आयोजित कार्यक्रमास पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ. रामदास डामसे, रुपेश शिरोळे, शिक्षक आ. डॉ. सुधीर तांबे, नाएसाेचे सचिव राजेंद्र निकम, सुनीता पाटील, केशवराव गायकवाड आदी उपस्थित होते. स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, डॉ. वैज्ञानिक रामदास डामसे, राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी ,पोलिस अधिकारी सदाशिव भडीकर, प्रभाकर रायते, विभागीय अधिकारी कैलास राभडिया, नितीन रोठे पाटील, वृषाली शेख आदींना सन्मानित करण्यात आले.

आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये प्रियंका निकम, पुष्पा वडजे, रंजना कदम, सुरेश लिलके, संजय अहिरे आदींनी गौरवण्यात आले. प्रास्ताविक भाऊसाहेब नेहरे यांनी केले. तर शेवटी रेखा नेहरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...